मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०१४

KING 34

३४


परस्य वीर्यं स्वबलं च बुद्ध्‌वा
स्थानं क्षयं चैव तथेव वृद्धिम्‌ ।
तथा स्वपेक्षेजप्यनुमृश्य बुद्ध्‌या
वदेत्क्षमं स्वामिहितं स मन्त्री ॥
                                  -रामायण़

जो पुरुष शत्रूचे आणि आपले बल जाणतो, शत्रूच्या आणि आपल्या सैन्याची स्थिति, वृद्धि आणि क्षय ह्यांचा बुद्धिपूर्वक विचार करतो, धन्याचे हित कशात आहे ते योग्य रीतीने त्याला सांगतो, तोच खरा मंत्री होय़. 
--रामायण़

मंत्रिमंडळातून फुटून आपला गट किंवा सत्ता स्थापण्याचे अनेक प्रसंग आपण पाहिले आहेत़.  आपल्या प्रमुखाला केवळ सत्य सांगण्याचे धाडस किंती मंत्र्यांमधे असलेले आपण अनुभवले आहे मला झाडू मारायला सांगितला तरी मी मारीन असे म्हटलेलेहि आपण पाहतो.  धन्याचे हित म्हणजे राष्ट्राचे हित असावे़. राजाचे मन्त्री होयबा नसावेत.  

-प्रशिप

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०१४

KING 33

३३


अनभिज्ञाय शास्त्रार्थान्‌ पुरुषाः पशुबुद्धयः ।
प्रागल्भ्याद्वक्तुमिचछन्ति मन्त्रिष्वभ्यन्तरीकृताः ॥
-रामायण़. 

मंत्रिजनांमध्ये समाविष्ट केलेले मूर्ख पुरुष शास्त्रार्थ समजत नसतांही आपल्या आंगच्या बोलकेपणाच्या जोरावर शास्त्रार्थाच्या गोष्टी सांगू इच्छितात़. 
-रामायण़. 

राजाने मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यावे हे इथे  सांगितले आहे़.  काही  नेत्यांना बोलता चांगले येते़ अशा लोकांचा उपयोग चुकांच्या समर्थनांसाठी केला जातो़.  पक्ष प्रवक्ते म्हणून किंवा चर्चात हिच माणसे भाग घेतलेली आपण पहातो़ ब-याचवेळा त्यांनी तोडलेले तारे हास्यास्पद  असतात़.  ते मंत्रि झालेलेहि दिसतात़. राज्यघटना, कायदा, समाजशास्त्र याच भान ज्यांना नाही त्यांना मत्रिमंडळात स्थान नसावे़. 

-प्रशिप. 

रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

KING 32

३२


स तु श्रेष्ठैर्गुणैर्युक्तः प्रजानां पार्थिवात्मजः ।
बहिश्चर इव प्राणो बभूव गुणतः प्रियः ॥
-रामायण़. 

उत्कृष्ट गुणांनी संपन्न असलेला तो राजकुमार राम आंगच्या गुणामुळे प्रजाजनांना शरीराबाहेर संचार करणारा प्राणच की  काय असा प्रिय झाला़. 
--रामायण़. 

आईला आपला मुलगा आपल्या शरीरा बाहेर असलेला आपला प्राण आहे असे वाटणे स्वाभाविक आहे़.  या पेक्षा अधिक  घट्‌ट नाते असू शकत नाही़.  असे नाते प्रजाजनांना राजपुत्र रामाबद्दल वाटावे ही राजा आणि प्रजा यातील परमोच्च अवस्था आहे़ म्हणूनच आदर्श राज्याला रामराज्याचा दर्जा प्राप्त होतो़. राजाच्या मुलाचा वर्तनाचा दाखला जनतेने दिला पाहिजे. राजाने देता कामा नये. 

-प्रशिप

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

KING 31

३१

सक्तं ग्राम्येषु भोगेषु कामवृत्तं महीपतिम्‌ ।
लुब्धं न बहु मन्यन्ते श्मशानाग्निमिव प्रजाः ॥
-रामायण़. 

जो राजा लोभी, ग्राम्य विषयांचे ठिकाणी आसक्त होणारा आणि मनास येइल तसे वर्तन करणारा असतो, त्याचा स्मशानातील अग्नीप्रमाणे  लोक तिरस्कार करतात़. 
-रामायण़. 

लोभ आणि काम आसक्ती या दोन गोष्टींच्या आहारी गेलेली व्यक्ती नाश पावते़ कारण त्यासाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते, त्यातून प्रमादच घडतात़ हिच बाब राजाचे बाबतीत घडली तर त्याचेसह राष्ट्र नाश पावते़ अशा राजाचा तिरस्कार  झाला नाही तरच नवल़.  जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत़. चारित्र्य संपन्न राजा हेच राज्याचे वैभव असते. 

--प्रशिप

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४

KING 30

३०


राजैव कर्ता भूतानां राजा चैव विनायक: ।
राजा सुप्तेषु जागर्ति राजा पालयति प्रजाः ॥
-रामायण़. 

राजाच सर्व लोकांचा कर्ता असून, त्यांचा मुख्य नायकही तोच आहे़ सर्व लोक निजले असता राजा जागतो, आणि त्यांचे पालन कंरतो़
-रामायण़. 

शत्रूंसाठी, चोरांसाठी रात्रीची वेळ अधिक उपयोगाची असते़.  सर्वाधिक भीती रात्रीच असते़ निर्भयपणे झोपता यावे म्हणून  रात्रीची गस्त, रस्त्यावरील प्रकाशदिवे, पोलीसनाके, अनोळखी  वा संशयास्पद व्यक्तीची चौकशी इ़. बाबी ह्या राजयंत्रनेचाच भाग आहे़त. म्हणजे जनता झोपली असता राजा जागरुकंपणे आपले पालन करीतच असतो़ ही यंत्रणा ढेपाळली तर राजा झोपला असे समजावे़. 

-प्रशिप. 

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

KING 29

२९

राजदोषैर्विपद्यन्ते प्रजा ह्यविधिपालिताः ।
असद्वृत्ते हि नृपतावकाले म्रियते जनः ॥
--रामायण़

राजाने योग्य रीतीने प्रजेचे पालन केले  नाही, तर त्या राजाच्या दोषामुळे प्रजेवर संकटे कोसळतात़ राजा दुर्वतन करणारा निघाल्यास लोक अकाली मरतात़
--रामायण़. 

कर्तव्य न करणे हे दुर्वतनच आहे़ पण त्यमुळे लोक अकाली कसे मरतातअकाली मरणाची कारणे बहुदा युद्ध,नैसर्गिक आपत्ती,रोगराइ,अपघात, भीती इ़. असतात़.  युद्ध करण्याची हिम्मत शत्रूला होउ नये अशी सैनिकी  तयारी असावी़ दुष्काळा  सारख्या नैसर्गिक आपत्तिचा व रोगराइचा सामना करण्याची पूर्व तयारी हवी, अपघातावर नियंत्रनासाठी आधकाधिकं योजना हव्यात, आणि मग निर्भयतेने जगता येण्याची खात्री देणा-या राजाच्या देशात अकाली मरण येणार नाही़
--प्रशिप. 

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

KING 28

२८


क्षममाणं नृपं नित्यं नीचः परिभवेज्जनः ।
हस्तियन्ता गजस्येव शिर एवारुरुक्षति ॥
-महाभारत़

राजा सदैव अपराधाची क्षमा मागू लागला, म्हणजे निकृष्ट प्रतीचे लोकसुद्धा  त्याची अवज्ञा करु लागतात़. हत्तीच्या मस्तकावर आरोहण करणा-या माहूताप्रमाणे ते त्याच्या डोक्यावर बसण्याची इच्छा करु लागतात. 
--महाभारत़

राजा ज्ञानी आणि तत्ववेत्ता असावा तो याच साठी़ राजा कडून खरे म्हणजे चूकाच होउ नयेत़ म्हणजे त्याला क्षमा मागायची वेळ येता कामा नये़ लोकप्रतिनिधी निवडतांना नेहमी चूका  करुन क्षमा मागणारा निवडता कामा नये़ अन्यथा ती आपली चूक ठरेल आणि ह्या चुकांना  क्षमा नाही़. 
  -प्रशिप. 


मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

KING 27

२७


नित्यमुद्यतदण्डस्य भृशमुद्विजते नरः ।
तस्मात्सर्वाणि भूतानि दण्डेनैव प्रसाधयेत ॥
-महाभारत़. 

दंडशक्ति नेहमी सज्ज असली म्हणजे लोक फार घाबरून असतात य़ास्तव राजाने सर्व प्राण्यांना दंडशक्तिच्या योगानेच आपल्या ताब्यात ठेवावे़. 
-महाभारत़. 

दंड शक्ति म्हणजे शिक्षा करण्याचा अधिकार.  (अपराध्यास) आजहि जागात सर्वत्र दंड संहिता अस्तित्वात आहेत त्याचा उपयोग राजधर्म म्हणून करणे आवश्यक आहे़ निरापराध्यास त्रास होणे किंवा शिक्षा होणे हा दंडसंहितेचा मोठा अवमान ठरतो़. दंड शक्तीच्या यंत्रणा राजाने आपल्या स्वार्थासाठी वापरू नये. 

--प्रशिप

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०१४

KING 26

२६


लोहितोदां केशतृणां गजशैलां ध्वजद्रुमाम्‌ ।
मही करोति युध्देषु क्षत्रियो यः स धर्मवित्‌ ॥
-महाभारत़

जो संग्रामामधे पृथ्वीला रक्तरुपी जलाने युक्त, केशरुपी तृणाने आच्छादित झालेली, गजरुपी पर्वत असलेली व ध्वजरुपी वृक्षांनी युक्त अशी करतो, तोच क्षत्रिय खरा धर्मवेत्ता होय़
--महाभारत़. 

ज्या देशाचा राजा युद्धात विजय मिळविण्यासाठी सक्षम असतो,देशाला हिरव्या शालूने नटलेल्या अवस्थेत ठेवतो, सर्व देश  वृक्षांनी वैभवशाली बनवितो आणि जो देश पर्वतांनी युक्त असतो, तो राजा धर्मवेत्ता असतो़. यातील पर्वत राजा निर्माण करीत नाहीत, ते नैसर्गिक असतात़ थोडक्यात पर्वतांचे रक्षण करणे राजधर्म आहे, पर्यावरणाशी याचा संबध आहे़ राज्यकर्ते तेकड्या नष्ट करुन घरं बांधायला परवानगी देउ लागलेत तर ते धर्मवेत्ते कंसे समजले जाणार ?

--प्रशिप. 

रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४

KING 25

२५


ब्रह्म क्षत्र्रेण सहितं क्षत्त्रं च ब्रह्मणा सह ।
संयुक्तौ दहतः शत्रून्वनानीवाग्निमारुतौ ॥
-महाभारत़. 

ब्राह्मणाने क्षत्रियाशी व क्षत्रियाने ब्राह्मणाशी सहकार्य केले म्हणजे ते दोघे मिळून वनेच्या वने जाळून फस्त करणा-या आग्निवायू प्रमाणे शत्रूना जाळून टाकतील़. 
-महाभारत़. 

सोशल इंजिनीअरींग या शब्दाखाली अनेक राजकीय नेते ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना एकत्र करुन राजकीय समिकरणे बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत़ केवळ ज्ञानाने निश्चत विजय मिळत नाही, आणि केवळ शक्तिने विजय मिळत नाही़ ज्ञान आणि शक्ति एकत्र झाल्यास विजय निश्चित असतो़ पण हे सर्व राजधर्मासाठी करावयाचे असते़

--प्रशिप. 

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४

KING 24

२४

अहं वो रक्षितेत्युक्त्वा यो न रक्षति भूमिपः ।
स संहत्य निहन्तव्यः श्वेव सोन्माद आतुरः ॥
-महाभारत़. 

मी तुमचे रक्षण करीन असे म्हणून जो राजा त्या प्रमाणे प्रजेची रक्षण करत नाही त्याला सर्वांनी एक होउन, सडक्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे ठार करावे़. 
--महाभारत़

एखाद्या राजाच्या वाट्याला अशी अवस्था येत असेल तर ते अत्यंत भयावह आहे़ जगाच्या इतिहासात, अगदि ह्या शतकातहि अशा घटना घडलेल्या आहेत़.  जनतेचे रक्षण करणे हाच मोठा राजधर्म असतो़ तसे न केल्यास भयावह शिक्षा राजाला देण्याचा प्रसंग जनतेसमोर निर्माण होऊ शकतो़ राज्यकर्ते होऊ इच्छिना-यांनी याच  भान ठेवायला हव. 
--प्रशिप. 


शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०१४

KING 23

२३


धर्मो ह्यधर्मेण सत्यं यत्रानृतेन च ।
हन्यते प्रेक्षमाणानां हतास्तत्र सभासदः ॥
                                      -महाभारत़

ज्या सभेत सभासदांच्या डोळ्यादेखत धर्माचा अधर्माने व सत्याचा असत्याने खून केला जातो, त्या सभेतील सभासदांचा धिक्कार  असो़. 
--महाभारत़

कोणत्याही सभागृहात आपली कर्तव्य न पाळणे, आपले मत किंवा भाषण पैशावर विकणे, प्रश्न विचारण्यासाठी पैशे घेणे दुस-यांचे विचार न ऐकणे, चुकांबद्दल क्षमा न मागणे,सत्य लपऊन ठेवणे, आणि हे सर्व सगळ्यांच्या डोळ्यादेखत करणे याचा धिक्कार करावाच तथापि अशी माणसं प्रतिनिधी म्हणून निवडले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी़. 
--प्रशिप.  

                                                     -प्रशिप

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०१४

KING 22

२२


न सा सभा यत्र न सन्ति वृध्दा
न ते वृध्दा ये न वदन्ति धर्मम्‌ ।
नासौ धर्मो यत्र न सत्यमस्ति
न तत्सत्यं यच्छलेनाभ्युपेतम्‌ ॥
                                -महाभारत़

जेथे वृध्द लोक नाहीत ती सभा नव्हे़. जे धर्माला अनुसरुन भाषण करीत नाहीत ती वृध्द नव्हेत़. ज्यात सत्य नाही तो धर्म नव्हे़.  आणि जे कपटाने युक्त असेल ते सत्यही नव्हे़
-महाभारत़. 

सभागृहातील प्रतिनिधी कसे असावेत? ते वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध असावेत़़.  वयोवृद्ध असलेले ज्ञानी असतातच असे नाही़ त्यांच्या भाषणावरून त्यांच ज्ञान ओळखावे़.  अशा प्रतिनिधींनी सांगितलेले सत्य कपटाणे युक्त असेल तर तेहि सत्य म्हणून स्विकारु नये़
-प्रशिप. 


बुधवार, १ ऑक्टोबर, २०१४

KING 21

२१


कच्चिद्राष्ट्रे तडागानि पूर्णानि च बृहन्ति च।
भागशो विनिविष्टानि न कृषिर्देवमातृका ॥
-महाभारत़. 

(नारदमुनी युधिष्ठिराला विचारतात) तुझ्या  राज्यात पाण्याने तुडुंब भरलेले मोठाले तलाव जागोजाग खोदलेले आहेत ना? शेती केवळ पावसावर अवलंबून नाही ना?
-महाभारत़. 

भारत शेती प्रधान देश आहे़.  त्या कंाळापासून शेती ही केवळ पावसाच्या पाण्यावर अवलबूंन राहू शकत नाही हे निश्चित केलेले आहे़ त्या साठी साठा करुन ठेवणे याला दुसरा पर्याय नाही़. या साठी अनेक ठिकाणी तलाव खोदणे हेच त्याचे श्रेष्ठ उत्तर आहे़ त्या साठी नियोजन न करणे, नियोजन अपूर्ण ठेवणे, काळाचा व्यय करणे, त्यात जनतेच्या पैशाची लूट होणे या बाबी राज्यकर्त्यांसाठी वैभवशाली नव्हेत
-प्रशिप. 



मंगळवार, ३० सप्टेंबर, २०१४

KING 20

२०


राजैव कर्ता भूतानां राजैव च विनाशक: ।
धर्मात्मा यः स कर्ता स्यादधर्मात्मा विनाशक: ॥
-महाभारत़

प्राण्यांचे कल्याण करणारा राजाच आणि त्याचा नाश करणाराहि पण राजाच़ कारण.तो धर्माने वागेल तर कल्याणकर्ता आणि अधर्माने वागेल तर नाश करणारा ठरतो़
-महाभारत़

राजा हा दुधारी शस्त्रा प्रमाणे काम करु शकतो़ तो सर्व प्राणीमात्रांचा कल्याणकर्ता वा नाशकर्ता असू शकतो़ अणू बाँबचे परीणाम जगाने अनुभवले आहेत़ राजधर्माचे पालन करु शकणारा राजा निवडणे हाच त्यावरील उपाय व विवेक समजावा़
--प्रशिप


सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

KING 19

१९


राजानं प्रथमं विन्देत्ततो भार्या ततो धनम्‌ ।
राजन्यसति लोकंस्य कुतो भार्या कुतो धनम्‌ ॥
-महाभारत़

प्रथमतः (संरक्षण करणारा) राजा प्राप्त करुन घ्यावा त्यानंतर भार्या मिळवावी व द्रव्य मिळवावे़ कारण राजाच अयोग्य असेल तर स्त्री तशी कशी राहणार व धन तरी कसे मिळणार ?
-महाभारत़. 

सुखी संसाराच्या कल्पनेत चांगली स्त्री मिळावी, भरपूर धन प्राप्ती व्हावी,असे वाटणे स्वाभाविक आहे़ परंतू या सुखाच संरक्षण कोण करणार? तसे करणारा तो केवळ योग्यतेचा राजाच असू शकतो़ म्हणून अगोदर चांगला 'चारीत्र्यसम्पन्न'  राजा निवडला गेला पाहिजे याची काळजी घेणे आवश्यकं आहे़
-प्रशिप. 


रविवार, २८ सप्टेंबर, २०१४

KING 18

१८


राजमूलो महाप्राज्ञ धर्मो लोकस्य लक्ष्यते ।
प्रजा राजभयादेव न खादन्ति परस्परम्‌ ॥
                                           -महाभारत़

(बृहस्पति वसुमना राजाला सांगतात) लोक धर्माने वागतात,याचे कारण राजाच होय असे दिसून येते़ राजाच्या भीतीमुळेच लोक एकमेकांना खाऊन टाकीत नाहीत़
-महाभारत़. 

देशातील प्रत्येकं नागरीकाला निर्भयपणे जगता आले पाहिजे, फिरता आले पाहिजे हाच याचा अर्थ आहे़. या साठीच राजाने कायदा केलेला असतो़ त्यामुळेच समाज व्यवस्था टिकून राहते़ त्याचे कारण राज्यकर्ताच असतो़.  म्हणून असुरक्षितता यासाठी सरकारला जबाबदार धरले जाते़
-प्रशिप


शनिवार, २७ सप्टेंबर, २०१४

KING 17

१७


राजमूला महाबाहो योगक्षेमसुवृष्टयः ।
प्रजासु व्याधयश्चैव मरणं च भयानि च ॥
-महाभारत़

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) प्रजेचा योगक्षेम नीट चालणे, पर्जन्य चांगला पडणे, तसेच प्रजेला रोग, मरण अथवा भय  प्राप्त होणे या सर्वांचे मुख्य कारण राजाच आहे़. 
-महाभारत़. 

सार्वजनीक आरोग्याची जबाबदारी राज्यकर्त्यावर असते़ अनैसर्गिक मृत्यू, अपहरण, यांची जबाबदारी राज्यकंर्त्यावर आपण ठेवतोच़ पर्जन्य चांगला होण्यासाठी राजाच कारण आहे यावर कदाचित मतभेद होतील, परंतु आत्ताच्या दुष्काळाला  सरकार जबाबदार आहे असे म्हटले गेले़, येथपर्यंत विचार आला आहे ही बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे़
-प्रशिप


शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४

KING 16

१6
राजा कृतयुगस्रष्टा त्रेताया द्वापरस्य च ।
युगस्य च चतुर्थस्य राजा भवति कारणम्‌ ॥
-महाभारत़. 

जगात कृतयुग उत्पन्न करणारा राजाच होय़. तीच गोष्ट त्रेता युगाची आणि द्वापार युगाची आणि चौथ्या म्हणजे कलियुगालाहि राजाच कारण असतो़
-महाभारत़. 

कृतयुग इ़ ही गुणांवर आणि कर्मावर आधारीत एकप्रकारची कालगणनाच आहे़ सामाजीक जीवनाची स्थिती त्यातून व्यक्त केली जाते़.  या सर्व काळातील चांगल्या आणि वाईट परंपरा, घटना या सर्वांना राजाच कारण असतो असे म्हटले आहे़ म्हणूनच राजाची निवड करतांना जनतेने व्यापक विचार करणे आवश्यक आहे़. 
-प्रशिप


KING 15

१५
 युक्त्ता यदा जनपदा भिक्षन्ते ब्राह्मणा इव ।
अभीक्ष्णं भिक्षुरुपेण राजानं घ्नन्ति तादृशाः ॥
 -महाभारत़

राष्ट्रातील प्रजा उद्योगशील असूनहि जर भिक्षुरुपी बनून ब्राह्मणाप्रमाणे वारंवार भिक्षा मागू लागली तर तिच्या योगाने राजाचा वध होतो़
-महाभारत़

ब्राह्मण हा अपरीग्रह (संचय न करणे) करणारा असतो/होता़ म्हणून त्याला भिक्षा दणे आवश्यक होते़ कर्ज माफ करण्याची पद्धत पुन्हा पुन्हा केली आणि तशी सवयच जनतेला झाली तर राजाचा वध होऊ शकंतो़ पराभव होऊ शकंतो़
--प्रशिप

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०१४

KING 14

१४


यादृशो जायते राजा
तादृशोजस्य जनो भवेत्‌ ॥
                                        -महाभारत़

जसा राजा असेल तशी त्याची प्रजा होते़
                                          -महाभारत़

संस्कारांनी राजाच्या वर्तनुकीचा परीणाम जनतेवर होतो़. ज्या वेळी मुखातून, आमचे नेतेच भ्रष्ट आहेत तर आम्ही भ्रष्टाचार केला तर काय बिघडले? असे बाहेर पडत असेल तर तो वरील बाबीचाच परीपाक म्हणावा लागतो़. 
-प्रशिप


KING 13

१३

क्षत्रियस्य महाराज जये वृत्ति समाहिता ।
स वै धर्मस्त्वधर्मो वा स्ववत्तौ कंा परीक्षणा ॥
-महाभारत़

(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) हे महाराजा, युद्धात जय मिळविणे हा क्षत्रियाचा व्यवसाय ठरलेला आहे, मग त्यात धर्र्म असो किंवा अधर्म असो़ स्वतःच्या व्यवसायाची चिकिंत्सा कंरुन कंाय फायदा ?
                                            -महाभारत़

युद्ध बहूदा राजपदासाठी असत़ निवडनूकंाहि राजपदासाठीच असतात़ युद्धात जय मिळवणे याला व्यवसाय म्हटले आहे, आज निवडनूकंाहि व्यवसाय झाला आहे़ व्यवसायात धर्म अधर्म पाहिला जात नाही़ आज तोच विचार केला जातो़ परंतू वरील विचार दुर्योधनाचा आहे, खलनायकंाचा आहे, धृतराष्ट्राचा नाही हे लक्षात घेतले पाहिजे़ दुर्योधन त्याच वैभव नष्ट कंरणारा धनी आहे़
                                                     -प्रशिप


बुधवार, २४ सप्टेंबर, २०१४

KING -12

१२

यद्यदाचरते राजा तत्प्रजानां स्म रोचते ।
                                      -महाभारत़

राजा जे जे कंरतो ते प्रजेला आवडू लागते़
                                           -महाभारत़

सामान्य जनता उच्च तत्व विचारापासून लांब राहते़ त्यामुळे ती अनुकंरणासाठी आपल्या राजावर किंवा नेत्यावर अवलंबून असते,विसंबून राहते़ म्हणून त्या नेत्याने केलेली कृति ती योग्यच असेल असे माणून तो ती आवडीने स्विकारतो किंवा होयबा' वा लालसा म्हणून स्विकारतो यामुळे राजाने वा नेत्याने केलेल्या चुकीच्या गोष्टींचे समर्थन कंरणा-यांचीही चढाओढ लागते़ हे आपण नेहमीच अनुभवतो़. 
--प्रशिप


मंगळवार, २३ सप्टेंबर, २०१४

KING 11

11

यदा मधु समादत्ते  रक्षन्पुष्पाणि षट्पद : |
तद्वर्थान्मनुष्येभ्य  आददध्यादविहिन्सया  ||
--महाभारत. 

भ्रमर जसा फुलांना अपाय न करता त्यातील मध तेवढा काढून घेतो. त्या प्रमाणे लोकाचे मन न दुखावाता  त्यांचे पासून द्रव्य घ्यावे. 
--महाभारत 

राजाने देशासाठी कर घेणे आवश्यक आहे यात शंका नाही . त्या कराचा 'प्रमाण ' आणि  'देशासाठी'  हे शब्द महत्वाचे  आहेत. कर घेणे हे शोषण होता कामा नये आणि करदात्याला शारीरिक वा मानसिक अपाय होता कामा नये. अशा राजाची आवश्यकता असते. 
--प्रशिप 

सोमवार, २२ सप्टेंबर, २०१४

KING 10

१०

मधुदोहं दुहेराष्ट्रं भ्रमरा इव पादपम्  |
वत्सापेक्षी दुहेच्चैव स्तनान्श्च् न विकुट्ट्येत्  ||
--महाभारत .

भ्रमर जसा झाडावरील फुलाला धक्का न लावता त्या मधिल मध तेवढा हळूच काढून घेतो त्या प्रमाणे राजाने प्रजेचे मन न दुखावता तिजपासून कराच्या रूपाने द्रव्य ग्रहण करावे. अथवा, ज्या प्रमाणे गाइची धार काढणारा वासराला दुध राहील अशा बेताने धार काढतो , आचल अगदी पिळून कढत नाही. या प्रमाणे राजाने प्रजेचे पोषण होईल अशा बेतानेच कर घ्यावा 
--महाभारत. 


नियमितपणे वाढत जाणाऱ्या कराबद्दल लोक आक्रोश करतच असतात. 
राज्यकर्ते नाइलाजाने करवाढ केली असे समर्थन करत असतात. परंतु परदेशातील काळा पैसा, राज्यकर्त्यांकडे असलेली बेहिशोबी संपत्ती  राजाकाराभारात  आणल्यास वरील बाबींची काळजी न करता  अनेक वर्ष कर सुद्धा घ्यावा लागणार नहि. 
--प्रशिप 

रविवार, २१ सप्टेंबर, २०१४

KING 9



प्रीयते हि हरन्पाप: परवित्तमराजके ।
यादास्य उद्धरन्त्येन्ये तदा राजामिच्छति ।।
--महाभारत 

दुसऱ्याचे द्रव्य हरण करणाऱ्या पापी मनुष्याला देशात राजा नसलेला बरा वाटतो, पण जेंव्हा त्याचे द्रव्य दुसरे लोक नेऊ लागतात  तेंव्हा त्याला राजा असावा असे वाटू लागते.  
--महाभारत . 

गुन्हेगाराला शासन किंवा शासकीय यंत्रणा नकोशी होणे स्वाभाविक आहे. 
तथापि गुन्हेगारासाठीच राज्यकर्ते मदत करू लागले किंवा राज्यकर्तेच गुन्हेगारी पार्श्वभूमिचे निवडले गेले तर रडण्यापेक्षा तत्व अनुसरणे आवश्यक आहे. 
--प्रशिप

शनिवार, २० सप्टेंबर, २०१४

KING 8



प्रजा यस्य विवर्धन्ते सरसीव महोत्पलम ।
स सर्वफलभाग्राजा स्वर्गलोके महीयते  ।।
--महाभारत 

ज्या राजाच्या प्रजा सरोवरातील कमलाप्रमाणे वृद्धिंगत होत असतात , त्याला सर्व प्रकारची फळे प्राप्त होतात , व तो स्वर्गामध्ये पूज्य  होतो. 
--महाभारत 

स्वर्गाची कल्पना सर्वच मान्य करतील असे 
पण आपण ह्या जगतात पूजनीय व्हावे असं बहुसंख्य राज्यकर्त्यांना वाटू शकत. इतरांना वैभवशाली केल्यानंतर आपण वैभवशाली होत असतो. हे आमच्या राज्यकर्त्यांनी ध्यानात घ्यायला हवं. आपण मोठे होण्यासाठी इतरांना लहान करणे किंवा ठेवणे हे तत्व म्हणून स्विकारले गेलेले नाही . 
--प्रशिप .   

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०१४

KING 7



पुत्रा इव पितुर्गेहे विषये यस्य मानवा: |
निर्भया विचरिष्यन्ति स राजा राजसत्तम: ||
--.महाभारत .

बापाच्या घरात जसे मुलगे , तसे ज्याच्या राज्यात लोक निर्भयपणे संचार करु शकतात ,  तो राजा सर्व राजात श्रेष्ठ होय .
--महाभारत. 

जीवन जगतान्ना निर्भयता कशी असावी या बद्दलचे या पेक्षा अधिक चाङ्गले उदाहरण दुसरे नाही .राज्याला घराची उपमा दिली आहे. राजा हा त्या घराचा पालक आहे. आपल्या राज्यात किङ्वा आपल्याच आपल्याच घरात आपण असुरक्षित असु तर आपल्या राजाला आपले श्रेष्ठत्व सिध्द करावयास वाव आहे. 
--प्रशिप .