३३
अनभिज्ञाय
शास्त्रार्थान् पुरुषाः पशुबुद्धयः ।
प्रागल्भ्याद्वक्तुमिचछन्ति
मन्त्रिष्वभ्यन्तरीकृताः ॥
-रामायण़.
मंत्रिजनांमध्ये
समाविष्ट केलेले मूर्ख पुरुष शास्त्रार्थ समजत नसतांही आपल्या आंगच्या
बोलकेपणाच्या जोरावर शास्त्रार्थाच्या गोष्टी सांगू इच्छितात़.
-रामायण़.
राजाने
मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यावे हे
इथे सांगितले आहे़. काही नेत्यांना बोलता
चांगले येते़ अशा लोकांचा उपयोग चुकांच्या समर्थनांसाठी केला जातो़. पक्ष
प्रवक्ते म्हणून किंवा चर्चात हिच माणसे भाग घेतलेली आपण पहातो़ ब-याचवेळा त्यांनी
तोडलेले तारे हास्यास्पद असतात़. ते मंत्रि
झालेलेहि दिसतात़. राज्यघटना, कायदा, समाजशास्त्र याच भान ज्यांना नाही त्यांना
मत्रिमंडळात स्थान नसावे़.
-प्रशिप.