३०
राजैव कर्ता
भूतानां राजा चैव विनायक: ।
राजा सुप्तेषु
जागर्ति राजा पालयति प्रजाः ॥
-रामायण़.
राजाच सर्व लोकांचा कर्ता असून, त्यांचा मुख्य
नायकही तोच आहे़ सर्व लोक निजले असता राजा जागतो, आणि त्यांचे पालन कंरतो़
-रामायण़.
शत्रूंसाठी, चोरांसाठी रात्रीची वेळ अधिक उपयोगाची
असते़. सर्वाधिक भीती रात्रीच असते़ निर्भयपणे झोपता यावे म्हणून रात्रीची गस्त, रस्त्यावरील प्रकाशदिवे, पोलीसनाके,
अनोळखी वा संशयास्पद व्यक्तीची चौकशी
इ़. बाबी ह्या राजयंत्रनेचाच भाग आहे़त. म्हणजे जनता झोपली असता राजा जागरुकंपणे आपले
पालन करीतच असतो़ ही यंत्रणा ढेपाळली तर राजा झोपला असे समजावे़.
-प्रशिप.