२९
राजदोषैर्विपद्यन्ते प्रजा ह्यविधिपालिताः ।
राजदोषैर्विपद्यन्ते प्रजा ह्यविधिपालिताः ।
असद्वृत्ते हि
नृपतावकाले म्रियते जनः ॥
--रामायण़
राजाने योग्य
रीतीने प्रजेचे पालन केले नाही, तर त्या राजाच्या दोषामुळे प्रजेवर संकटे कोसळतात़ राजा दुर्वतन करणारा निघाल्यास लोक अकाली मरतात़
--रामायण़.
कर्तव्य न
करणे हे दुर्वतनच आहे़ पण त्यमुळे लोक अकाली कसे मरतात? अकाली मरणाची कारणे बहुदा युद्ध,नैसर्गिक आपत्ती,रोगराइ,अपघात, भीती इ़. असतात़. युद्ध करण्याची हिम्मत शत्रूला होउ नये अशी
सैनिकी तयारी असावी़ दुष्काळा सारख्या नैसर्गिक आपत्तिचा व रोगराइचा सामना
करण्याची पूर्व तयारी हवी, अपघातावर
नियंत्रनासाठी आधकाधिकं योजना हव्यात,
आणि मग निर्भयतेने जगता येण्याची खात्री देणा-या राजाच्या देशात अकाली मरण
येणार नाही़
--प्रशिप.